Ad will apear here
Next
मराठीची लिपी


मराठीची लिपी म्हणून, बोली म्हणून असलेली वैशिष्ट्यं सांगणारी ‘आमुची लिपी’ ही कविता आज पाहू या. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र सोपानदेव चौधरी यांनी ती लिहिली आहे.
.....
लिपी आमुची नागरी
स्पष्ट उच्चारांचे वर्ण 
महाराष्ट्रीयां लाभली
वाणी तैसी ही संपूर्ण।।१।।

नसे उच्चारांची व्याधी
नसे लेखनात अढी
जात धोपट मार्गाने
स्वर-व्यंजनांची जोडी।।२।।
 
अहो, हिची जोडाक्षरे 
तोड नाही त्यांना कुठे
उच्चारातली प्रचीती
जशी ओठांवरी उठे!।।३।।

जैसे लिहू तैसे वाचू
जैसे बोलू तैशा खुणा
जे जे लेखी तेच मुखी
ऐसा मराठीचा बाणा।।४।।

सर्व उच्चारांचे शोधा
शास्त्रज्ञांनो, यंत्र एक
तेच दिसेल तुम्हाला
महाराष्ट्रीयांचे मुख!।।५।।

नाद-ध्वनी उच्चारांना
देत सदा आवाहन
लिपी ऐसी ही प्रभावी
माझ्या भाषेचे वाहन।।६।।
- सोपानदेव चौधरी
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZOYCJ
Similar Posts
नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी भक्तीपासून शौर्यापर्यंत मराठी कशी वैशिष्ट्यपूर्ण आहे, हे सांगणारी रा. अ. काळेले यांची ‘नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी’ ही कविता आज पाहू या.
माझी बोली असे मराठी मराठी बोली अन् भाषा कशी श्रेष्ठ आहे, हे सांगणारी ‘माझी बोली असे मराठी’ ही मा. रा. पोतदार यांची कविता आज पाहू या...
माझ्या मराठीची गोडी ‘जिची थोरवी दररोज नवे रूप दाखवते आणि जिच्यासमोर आपोआप नतमस्तक व्हायला होतं,’ असं म्हणणारी वि. म. कुळकर्णी यांची ‘माझ्या मराठीची गोडी’ ही कविता आज पाहू या.
माझ्या मराठी मातीचा... आज २७ फेब्रुवारी, कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिन. अर्थात मराठी राजभाषा दिन. त्या निमित्ताने पाहू या, ‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा’ असं सांगणारी कुसुमाग्रजांची कविता...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language